नागपूर : नागपूर महानगरपालिकेने (NMC) नागपूर हिंसा प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली असून, कथित मास्टरमाइंड फहीम खान आणि आणखी एका आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. मात्र, मनपाच्या या कारवाईवर आता बॉम्बे उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने स्थगिती दिली आहे.फहीम खान नागपूर दंगलीत आरोपी केल्यावर कळले काय कि त्याचे घर हे अनधिकृत आहे ?त्यापूर्वी कळले कसे नाही ? असे सवाल उपस्थित होत असताना न्यायालयाने नमूद केले की, कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली पाहिजे, अन्यथा ही निवडक आणि हेतुपुरस्सर कारवाई ठरू शकते. याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत मनपाला कोणत्याही नव्या कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे.१७ मार्चला रात्री नागपूरात हिंसाचार (Nagpur Violence) उसळला होता. त्यानंतर या घटनेचा म्होरक्या फहीम खान सहित अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्याच्यासहित सहा जणांवर देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमच्या अन्य बाबींचा तपास करताना त्याच्या संजयबाग येथील ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने नागपूर महानगरपालिकेने ही तोडण्याची कारवाई केली होती.
हिंसेच्या घटनेनंतर मनपाने फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला होता. यावर फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही कारवाई पक्षपाती स्वरूपाची आहे आणि निवडक पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे यावर त्वरित स्थगिती दिली जाते. तसेच, राज्याच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता नागपूरातील यशोधरा नगर येथील यशोधरानगर येथील संजय बाग कॉलनीतील मनपाने फहीम खानच्या घरावर कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे महाल परिसरात एका अनधिकृत दोन मजली इमारतीवरही बुलडोझर चालवण्यात आला. मनपाने एक दिवस आधी नोटीस बजावली होती आणि अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. यानंतर आज सकाळी मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई करत ही इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, विद्युत वितरण कंपनीनेही या घराचा वीज पुरवठा खंडित केला. मनपाच्या या कारवाईनंतर बॉम्बे उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.