म्हणाले,’ पुण्यात दिसल्यास चोप देणार..!!
पुणे-कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा पुणे शहराच्या वतीने तीव्र निषेध करतो. तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या कामराचा आबारा का डाबरा करण्याचा कडक इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.कुणाल कामरा याने आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा या कुणाल कामराचा आबरा का डाबरा करायला आम्हाला वेळ लागणार नाही अशा कडक शब्दात पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी इशारा दिला. तसेच हा वाचाळवीर कुणाल कामरा पुणे शहरात दिसल्यास त्याला शिवसेना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
तथाकथित स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करून त्याच्या खालच्या पातळीचे वैचारिक दर्शन घडवले आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीतील नेतृत्वाला, लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असल्याचे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले आहे.
शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे. अशा नेत्याविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हा केवळ शिंदे यांचाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.
लोकशाहीमध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मान आहे, मात्र त्याच्या मर्यादा ओलांडून अत्यंत हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला कधीही न शोभणारी आहे, कुणाल कामराची ही भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह्य नसून बेजबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या भावनांचा अपमान होईल.