पुणे : २४ मार्च २०२५
एका वयोवृद्ध विधवा महिलेने आपल्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाला अखेर यश आलेय , करारानुसार घराचा ताबा वेळेत न दिल्याने तसेच करारात नमूद केलेल्या सुविधा न पुरवल्याने, न्यायालयाने बिल्डर अलीअसगर याच्याविरोधात FIR नोंदवण्याचा आदेश दिला आहे वयोवृद्ध महिलेच्या वतीने न्यायालयात अॅड.क्रांती सहाणे, अॅड सुरज जाधव, अॅड स्वप्नील गिरमे, अॅड आदिल दातरांगे, अॅड नेहा पिसे, अॅड नुपूर अरगडे, अॅड सागर मांढरे, यांनी बाजू मांडली.
ही वयोवृद्ध महिला एका मोठ्या आशेने घर घेण्यासाठी पुढे आली होती. वृद्धापकाळी आधार मिळावा, सुरक्षित घर मिळावे, आयुष्यभराच्या कष्टाची काहीतरी शाश्वती असावी या आशेने घर घ्यायला निघालेल्या या महिलेच्या स्वप्नांवर बिल्डरच्या फसवणुकीमुळे पाणी फिरले. वेळीच घराचा ताबा न मिळाल्याने, तसेच करारातील सुविधा न दिल्याने तिच्यासारख्या अनेक सदनिके धारकांना अन्याय सहन करावा लागत आहे.
६० वर्षीय विधवा महिलेने बिल्डरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून लढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, पण न्यायालयाच्या आदेशाने अखेर २२ मार्च २०२५ रोजी अलीअसगर आयसक्रीमवाला बिल्डरविरोधात FIR नोंदवण्यात आली.
फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडा–या महिलेच्या न्यायासाठी केलेल्या लढ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळू शकतो. फक्त योग्य मार्गाने संघर्ष करण्याची तयारी हवी!”ही कारवाई म्हणजे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडा आहे! सामान्य लोकांचे हक्क हिरावणाऱ्या बिल्डर्सला आता जबाबदारी स्वीकारावीच लागेल. या महिलेसारख्या असंख्य ग्राहकांची स्वप्ने चिरडली जात आहेत, आणि आम्ही ते होऊ देणार नाही!”
— अॅड. तोसिफ शेख