म्हणाल्या, एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान नाही काय ?
मुंबई- स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या बद्दल आता प्रख्यात अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही या विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यांनी कुणालला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही त्यांचे मत व्यक्त केले आहे.
कुणाल कामराने त्यांच्या एका शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही वेगळ्या ढंगात कविता सादर केली होती, त्यानंतर हॅबिटॅट कॉमेडी क्लबवर त्यांच्या लाईव्ह शो दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केला. आणि तोडफोड करण्यात आली. आता या प्रकरणात केलेल्या कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जया बच्चन यांनी या मुद्द्यावर संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘जर बोलण्यावर बंदी असेल तर तुमचे काय होईल?’ तुमची तशीही परिस्थिती वाईट आहे. तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त काही विशिष्ट विषयांवर बोलण्यास सांगितले जाईल आणि काही प्रश्न विचारू नयेत असे सांगितले जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे?जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘ कारवाईची स्वतंत्रता केवळ तेव्हाच असते जेव्हा मोठा गोंधळ निर्माण होतो. – विरोधकांना मारहाण करणे, महिलांविरुद्ध गुन्हे करणे, लोकांना मारणे – अशाच कृती करण्याचे जणू इथे स्वातंत्र्य असते.’ एकनाथ शिंदेंचा अवमान केला म्हणून कमरा वर कारवाई झाली असे विचारता त्या म्हणाल्या , एकनाथ शिंदेंनी फक्त सत्तेसाठी शिवसेना फोडली, चोरली हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?

