नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली
२२- २३ रोजी कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स मध्ये भव्य आयोजन
पुणे-पुणेकरांना कथ्थक, सत्रीय, ओडिशी आदी शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भूत अविष्कार अनुभवायला मिळणार असून, जवळपास ५०० पेक्षा जास्त नृत्यांगना नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटे यांना आदरांजली वाहणार आहेत. येत्या २२ आणि २३ मार्च रोजी कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शास्त्रीय नृत्य हा भारतीय सांस्कृतिचा अविभाज्य भाग आहे. प्रचीन काळापासून भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकारांना एक शिस्त आणि कलेच्या माध्यमातून ईश्वराला समर्पित करण्याचा मार्ग म्हणून शास्त्रीय नृत्य कलेला ओळखले जाते. कथ्थक, भरतनाट्यम्, कुचीपुजी, ओडिसी, कथकली, मोहिनीपट्टणम्, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली असून, या सर्व शैली पुणेकरांना एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहेत.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये २२ आणि २३ मार्च रोजी सायं. ५.३०. वा. शुभारंभ लॉन्स पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हैदराबादच्या ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मश्री आनंद शंकर जयंत आणि कथ्थक उस्ताद निरुपमा आणि राजेंद्र आदींसह जवळपास ५०० पेक्षा जास्त शास्त्रीय नृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
तसेच, या महोत्सवानिमित्त नृत्य गुरु शमा भाटे, गुरु मनीषा साठे, गुरु सुचेता चापेकर या देखील मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
शास्त्रीय नृत्य हा भारतीय सांस्कृतीचा कलेचा अविभाज्य भाग असल्याने जागतिक स्तरावर ही भारतीय शास्त्रीय नृत्याला एक आदराचे स्थान आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या परदेश दौऱ्यावेळी देखील भारतीय शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत केले जाते. तसेच, अनेक परदेशी नागरिक देखील भारतीय शास्त्रीय नृत्य कलेवर अध्ययन करत आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे आणि शास्त्रीय नृत्य कलेचे अद्भूत दर्शन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तरी सदर कार्यक्रमास पुणेकरांनी अवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ना. पाटील यांनी यानिमित्ताने केले आहे.