पुणे -काेंढवा परिसरातील काैसरबाग याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगवरुन झालेल्या वादातून दाेनजणांनी एकमेकांवर धारदार तलवारीने वार करुन दाेघे जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. सदर जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्रफ अश्फाक शेख (वय- ३०,रा. मिठानगर,काेंढवा, पुणे) व गणेश सुभाष राखपसरे (३२,रा. शेरखान चाळ, काेंढवा,पुणे) अशी जखमी झालेल्या दाेनजणांची नावे आहे. याप्रकरणी काेंढवा पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काेंढवा परिसरात काैसर बाग येथील सना हाॅस्पिटल समाेर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. गणेश राखपसरे याने त्याची कार संबंधित ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली हाेती. त्यावरुन त्याचे अश्रफ शेख याच्यासाेबत वाद हाेऊन एकमेकांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी दाेघांनी त्यांच्या गाडीतून धारदार शस्त्र काढूनएकमेकांवर वार केल्याने ते जखमी झाले. याप्रकरणात दाेघे जखमी झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात अाले. पाेलीसांकडे याबाबत दाेघांनी परस्पर विराेधात तक्रार दाखल केली असून ते बरे झाल्यावर त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पाेलीस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. आराेपींची सध्या प्रकृती स्थिर असून त्यांचे जबाब पाेलीसांनी नाेंदवले आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पाेलीस करत आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या ललित ससाणे या आराेपीने त्याचे इतर साथीदार यांच्याशी आपसात संगनमत करुन, त्याच्यावर दाखल गुन्हयाचे तपासात दबाव निर्माण करण्यासाठी लाेहियानगर येथे बेकायदेशीर जमाव जमवला. जमावाचे माध्यमातून तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत पाेलीसांना त्यांचे कर्तव्यापासून परावृत्त करणेचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी ललित ससाणे, विकी ससाणे व इतर आराेपींवर खडक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीस निरीक्षक मनाेजकुमार श्रीरंग लाेंढे यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.