पुणे- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास मान्यवर नागरिक, खेळाडू आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत . या संदर्भात या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी चे पदाधिकारी स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने यांनी सांगितले कि,’कर्वेनगर प्रभागात लोकप्रतिनिधी या नात्याने प्राप्त झालेल्या पहिल्याच संधीत अर्थात सन २०१७ साली आपल्या सहयादी निधीतून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित करत लोकार्पण केले. गेल्या आठ वर्षांत प्रभागातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना सेवा देण्याचे कार्य येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन सिंथेटीक टेनिस कोर्ट करत आले आहेत.
आजमितीस अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले असून ही नक्कीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. परंतु लोटत जाणाऱ्या काळासोबत टेनिस कोर्टची अत्याधुनिकता राखणे आवश्यक होते. या अनुषंगाने वेळोवेळी पुणे मनपाकडे पाठपुरावा करत आपण तब्बल २५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला व या निधीतून येथिल दुरुस्तीची अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.सदर निधीतून टेनिस कोर्टचे नूतनीकरण करताना कोर्टवरील सिंथेटिक कोर्टचे रीकोटिंग, भेगा बुजवणे, डागडुजी, रंगकाम, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण आणि अशी विविध कामे पूर्णत्वास गेली. यामुळे प्रभागातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिक यांच्यातून समाधान व्यक्त आहे. काळानुसार बदलणाऱ्या खेळात खेळाडू म्हणून स्वतःमध्ये बदल करणे, काळाची गरज असून त्यासाठी त्यांना उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करणे, हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे. खेळाप्रती आकर्षण आणि प्रेम टिकून राहावे, यासाठी वेळोवेळी बदल आणि नूतनीकरण नेहमीच आवश्यक असते.
आज नागरिकांची कौतुकाची थाप हीच आमच्या कामाची पोहोच पावती असून हे क्रीडा संकुल ज्या नागरिकांसाठी-खेळाडूंसाठी विकसित केले, त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत एक छोटासा नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.