पुणे-महाराष्ट्रात संवाद मराठीतच..अन्यथा ..रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिखित इशारा .. येथील शिवसेना पदाधिकारी यांनी समक्ष भेटून दिला . आज दुपारी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्र ऑफिसला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत धडक दिली.या संदर्भात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी येथे सांगितले कि,’हे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे ऑफिस मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्राचे प्रमुख कार्यालय आहे.ह्या दरम्यान जी चर्चा आमच्यात झाली एक त्या चर्चेत रिलायन्स जिओ तर्फे उच्च पदस्थ अधिकारी श्री गोसावी आणि श्री लांडगे उपस्थित होते.त्यांना मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून कोणत्याही परिस्थितीत रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी मराठीचाच वापर केला पाहिजे, हे स्पष्ट करण्यात आले. तसेच आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, अशा वेळी जर तुमचा ग्राहक सेवा प्रतिनिधी हिंदीत संवाद साधत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले. देशातील इतर राज्यात आपण सेवा देताना तेथील स्थानिक भाषेला प्राधान्य देत आहात. मग महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य का दिल जात नाही ? अशी विचारणा करण्यात आली.
ह्यावेळी, रिलायन्स जिओला त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी ती मान्य केली असून, ह्या मुदतीत “मराठी प्रथम” ह्या तत्वाची अंमलबजावणी न झाल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने आंदोलनातून दणका देण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
ह्या वेळी गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आबा निकम, राजेंद्र शिंदे, मकरंद पेठकर, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, राजेश मोरे, गोविंद निंबाळकर, संजय वाल्हेकर उपस्थित होते.
महाराष्ट्रात संवाद मराठीतच..अन्यथा ..रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिखित इशारा ..
Date: