पुणे- ABP माझाचे पुण्यातील प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना पत्रकारितेमधील नामांकित रामनाथ गोयंका एक्सेलन्स इन जर्नलिझम पुरस्कार बुधवारी (दि.19) प्रदान करण्यात आला. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोंजारी यांनी महाराष्ट्रातील अँडरवर्ल्ड ड्रग्ज रॅकेटच्या बातम्यांचा पाठपुरावा चिकाटीने केला. शहरातील MIDC ड्रग्ज तस्कऱ्यांचे अड्डे कसे बनले? त्यामध्ये सरकारी रुग्णालय, तुरुंग प्रशासन आणि पोलीस दलातील अधिकारी कसे सहभागी होते? याचं तीन महिने सखोल वार्तांकन केल्याने मंदार गोंजारी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सोबतच ड्रग्ज रॉकेटमुळे समाजावर कसा विघातक परिणाम होतो? आणि त्यासाठी प्रशासनातील संपूर्ण साखळी कशी यात सहभागी आहे? या प्रश्नाची उत्तर बातम्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.