पुणे : नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जागतिक चिमणी दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. पहिली ते चौथीतील 300 विद्यार्थ्यांनी चिमणीची चित्रे रेखाटून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी उभारण्याचा तसेच त्यांच्यासाठी एक घास व पाणी देण्याची शपथ घेतली, पियूष शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिक्षिका योगिता भावकर, पुष्पा देशमाने, धनंजय तळपे, तनुजा तिकोने, मीनल कचरे तसेच साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, ऋत्विक आदमूलवर, संयुक्त मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश पायगुडे, चैतन्य मारणे यांची उपस्थिती होती. जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व सांगत पियूष शहा यांनी चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
चित्र रेखाटून चिमणी संधर्वनासाठी शालेय विद्यार्थ्यांचा पुढाकार
Date: