मुंबई : रोहित पवार म्हणाले की, आजपासून पुढे भाजपाकडून या दिशा सालियन प्रकरणाचे वेगळे राजकारण केले जाईल. त्यावेळी(पूर्वी ) दिशा सालियनच्या वडिलांनी सांगितले होते की, कोणीही याबाबत राजकारण करू नये. पण राजकारण आजपासून सुरू झाल्याचे तुम्हाला दिसेल. भाजपा ज्यावेळी राजकारण करते, त्यावेळी त्यामध्ये त्यांचा काही ना काहीतरी हेतू असतो. ज्यावेळी बिहारची निवडणूक होती, त्यावेळी भाजपाकडून सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे राजकारण केले गेले होते.यावेळी रोहित पवार हे काही कागदपत्रेही दाखवताना दिसले. ते पुढे म्हणाले की, आता भाजपा हा मुद्दा बिहार निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये बाहेर काढतंय. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, आदित्य ठाकरेंचे नाव याप्रकरणात घेतले गेले आहे पण मी आदित्य ठाकरेंना फार जास्त जवळून बघतो. त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क यामुळे मी ठामपणे सांगू शक्यतो की, या प्रकरणात जरी आदित्य ठाकरेचे नाव आले असले तरीही त्यांचा या प्रकरणात काहीच संबंध नाहीये असा आत्मविश्वास आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये. हेच नाही तर त्यांनी या याचिकेत चक्क आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. फक्त आदित्य ठाकरेच नाही तर सतीश सालियन यांनी याचिकेत सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले. दिशा सालियन हिच्या वडिलांनी केलेल्या या आरोपांनंतर आता मोठी खळबळ निर्माण झालीये. नितेश राणे यांनी म्हटले की, मी पहिल्या दिवसांपासून हेच तर सांगत होतो. यावरून राज्यातील राजकारण आता तापल्याचे बघायला मिळतंय.
दिशा सालियन प्रकरणाबद्दल बोलताना आमदार रोहित पवार हे म्हणाले की, एखादा व्यक्ती आपल्या मुलीसाठी किंवा एखाद्या महिलेसाठी न्याय मागत असेल तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. पण न्याय मागत असताना त्यामध्ये काय खरे घडले हे सुद्धा लोकांना कळले पाहिजे. ज्यावेळी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता आणि सुशांत सिंह राजपूतचा त्यानंतर त्यावेळी तिच्या आई वडिलांनी वेगळी वक्तव्य केली होती. आता चार वर्षांनंतर त्यांना वाटत असावे, त्यांच्या मुलीला न्याय मिळावा म्हणजे ते कोर्टात गेले असतील.