महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने आयोजन
पुणे : कर्तृत्वाने स्त्री आपल्या सामर्थ्याची साक्ष देत असते. शिक्षण, विज्ञान, व्यवसाय, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत आजच्या स्त्रिया आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने करण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ सेवाव्रती महिलांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार ‘ देऊन गौरव करण्यात आला.
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, मॉडेल कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात स्वाती शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक व महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित होते. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक योगेश बजाज, विजय वरूडकर, अपूर्वा करवा व कोमल गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर पाटील, चेतन मराठे, चेतन शर्मा आणि रविंद्र चव्हाण यांनी विशेष योगदान दिले.
या सोहळ्यात किशोरी गद्रे, मनिषा सोनवणे, अलका गुजनाल, स्मिता गायकवाड, प्रीती मराठे, वैष्णवी पाटील, आदिती देवधर, सीमा सपकाळ, अनुराधा टल्लू, शिल्पा भट्टड, स्नेहल जगताप, सिद्धी क्षीरसागर, मीरा वानखेडे, चंद्रकला गावित, किरण माशाळकर, अनिता टापरे, डॉ. सोनाली शिंदे, डॉ. विनिता आपटे, डॉ. जान्हवी हासे, स्नेहा देव, छाया अबक, सोनल डुंगरवाल, शीतल पाटील, अर्चना गुंडारे आणि अनुराधा भाटकर यांना सन्मानित करण्यात आले.
विजय वरूडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुकुंद शिंदे यांनी स्वागत आणि आभार मानले.