पुणे : “देश का बल बजरंग दल.. छत्रपती के सन्मान में, बजरंग दल मैदान में.. हटली पाहिजे हटली पाहिजे औरंगजेब ची कबर हटली पाहिजे… एक धक्का और दो.. औरंगजेब की कब्र तोड़ दो” अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे, प्रांत गौरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवत, पूर्व पुणे मंत्री धनंजय गायकवाड, प्रांत विशेष संपर्क सह प्रमुख श्रीकांत चिल्लाळ, पूर्व पुणे बजरंग दल विभाग संयोजक सुशांत गाडे, सह संयोजक आकाश दुबे, जिल्हा संयोजक दत्ता तोंडे, चैतन्य बोडके, विक्रम घुंगरूवाले, निलेश बोमा, राजू कुंडले, सुरज पडवळ, ईश्वर राऊत, दिपूल इनामदार, जिल्हा मंत्री विजय कांबळे, आशिष दुसाने, विवेक गिरी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, क्रूरकर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही स्वतंत्र भारत देशात गुलामीचे, अनंत यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करायला हवी. जर शासनाने ही कबर नष्ट केली नाही, तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन कारसेवा करुन ती कबर उध्वस्त करेल.
नितीन महाजन म्हणाले, भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल.