आम आदमी पक्षाचा इशारा
पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर वस्तीतील पारी कंपनी जवळील पुणे महापालिकेचा दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प हटविण्यात यावा अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.काल रात्री लागलेल्या भिषण आगीत कचरा विलिनीकरण प्रकल्प जळुन खाक झाला. प्रकल्पातील कामगार गावी गेल्याने सुदैवाने कोणी मृत्यूमुखी पडले नाहीत.याबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,मुंबई महापालिका अधिनियम कायद्यानुसार लोकवस्तीच्या पाचशे मीटर दूर अंतरावर कचरा विलिनीकरण प्रकल्प असावा असा नियम आहे याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने दाट लोकवस्तीच्या मध्यभागी प्रकल्प उभारला आहे . प्रकल्प सुरू झाल्या पासून सातत्याने या प्रकल्पाला भीषण आगी लागत आहे.त्यामुळे स्थानिक रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे
रात्री सुदैवाने कामगार व आसपासच्या लोकवस्त्यांतील रहिवाशांचे प्राण वाचले मात्रआगीत लाखो रुपयांची साहित्य जळुन खाक झाले
धायरीच्या मध्यवस्तीतील या प्रकल्पामुळे सोसायट्यांसह परिसरात भितीचे वातावरण आहे.प्रशासनाने तातडीने प्रकल्प बंद करावा.भीषण आगीच्या घटनांमुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशी तक्रार धनंजय बेनकर, निलेश दमिष्टे, सनी रायकर, संदीप विठ्ठल पोकळे,संतोष चौधरी, चिंतामणी पोकळे, अमर खेडेकर,नेताजी बाबर, सुरेश परकर, अजय बेनकर या स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

