पुणे शहरात कर संकलनाच्या अनुषंगाने दामिनी महिलांची 12 पथके तयार करण्यात आलेली आहे सदर प्रत्येक पथकामध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांचेमार्फत शहरातील थकबाकीदार मिळकतींची पाहणी करून वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सदरचा प्रयोग हा प्रथमच राबवण्यात आलेला असून त्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे सदर पथकाकडून दहा लाख इतके रक्कम थकबाकी जमा करण्यात आली असून तीन मिळकती जप्त करण्यात आलेले आहेत
-उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप
उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप , महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे , प्रशासन अधिकारीरवींद्र धावरे सर, प्रशासन अधिकारी सोपान वांजळे , प्रशासन अधिकारी श्रीमती.रजनी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पेठ धायरी येथे मध्यवर्ती महिला वसुली पथक व टीम यांचे समवेत मिळकत कारवाईसाठी गेलेल्या पथकाने , मिळकतदाराकडून PDC व चालू चेकने रक्कम रुपये दहालाख रुपये वसूल केले.ही वसुलीमहिला पथक प्रमुख वंदना पाटसकर, प्रीती चव्हाण,शुभांगी खसासे वैशाली कामथे दिपाली चव्हाण गौतमी कोडम व सर्व विभागीय निरक्षक पेठ निरीक्षक चेतन मोकाशी यांनी केली.
आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता मिळकतकर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.यासाठी महिलांची १२ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यात ६० महिलांचा समावेश आहे.पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २७२७ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण या वर्षात हे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले असून, आत्तापर्यंत २१५० कोटी रुपयेच वसुल झाले आहेत.त्यामुळे उर्वरित १५ दिवसात सुमारे ६५० कोटी रुपये कर वसुली करणे प्रशासनाला अशक्य आहे. पण या शेवटच्या १५ दिवसात जास्तीत जास्त कर वसुली करून ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरु आहेत.त्यासाठी महापालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, थकबाकीदाराच्या मिळकतीपुढे बॅंड वाजविणे, इमारती जप्त करणे, टाळे ढोकणे अशी कारवाई केली जात आहे. ही कारवाई आणखी प्रभावी करण्यासाठी खास महिला कर्मचाऱ्यांचे थकबाकी वसुलीचे १४ पथक तयार केले आहेत. त्यात ६० महिलांचा समावेश आहेत.
मिळकतकर विभागाचे उपयुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीच्या वसूलीसाठी आता कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांची १२ पथके वसूलीसाठी नेमण्यात आली आहेत.महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रयोग प्रथमच करण्यात आला असून, पहिल्या दिवशी या पथकाने तीन मिळकती जप्त केल्या आहेत. तर १० लाख रुपयांची वसुली केली आहे.