महिलांसाठी रॅम्पवॉक स्पर्धा ; मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग
पुणे: लिंगायत महिला मंचाच्या वतीने महिलांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आपटे रस्त्याजवळील सेंट्रल पार्क येथे करण्यात आले होते. महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्यांना वाव देणारे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.
महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ताणतणाव व्यवस्थापन आणि फिटनेस यासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आणि योग्य आहार, व्यायाम व मानसिक स्वास्थ्याची महत्वाची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी उपक्रमासाठी सुप्रिया हत्ते, सुप्रिया गाडवे, नीना लिगाडे, राजश्री हापसे, सीमा तोडकर आणि सोनाली कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांसाठी रुद्रपठण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच, रॅम्पवॉक विशेष आकर्षण ठरला, जिथे विविध वयोगटातील महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतला. या स्पर्धांचे परीक्षण रूपा सुत्तट्टी आणि पल्लवी शिवकुमारश्री यांनी केले. विविध कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली असून, त्यांना स्वतःच्या आरोग्याची आणि सशक्तीकरणाची जाणीव यानिमित्ताने झाली आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.