पुणे, १३ मार्च २५ – सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे (SSPU) ने ॲलेन युनिव्हर्सिटी, जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शना करीता चर्चा सत्राचे आयोजन केले होते. आज ॲलेन युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली.
ॲलेन युनिव्हर्सिटीतील, मिरियम कोल्मर-ट्रायनी (एमए), आंतरराष्ट्रीय संबंध आणि संशोधन विपणन तज्ञ, आणि प्रा. डॉ. अंजा डायकमन यांनी शिष्यवृत्तींबद्दल मौल्यवान माहिती दिली. या वेळी मेजर सोनाली कदम (निवृत्त) आणि राघवन संथानम, संचालक – स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे देखील उपस्थित होते.
या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ॲलेन युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगामुळे जागतिक संधी आणि शैक्षणिक प्राविण्य मिळवण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.