पुणे-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखानाने एक वॉकाथॉन आयोजित केला होता. अभिनव जोशी, एव्हीपी – ऑपरेशन्स, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना यांच्या संकल्पनेतून साकारलेला
हा कार्यक्रम कार्य-जीवन संतुलन, पोषणतत्त्वांची काळजी, महिलांची सुरक्षा आणि लिंग समानता यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला होता. त्यांनी वॉकाथॉनमध्ये सह्याद्रि हॉस्पिटल, डेक्कन येथील अनेक उत्साही महिलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी जांभळ्या रंगाच्या आरामदायक क्रीडावस्त्रांमध्ये यात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम सह्याद्रि हॉस्पिटल, डेक्कन येथून सुरू झाला आणि छत्रपती संभाजी महाराज गार्डन, जे.एम. रोड येथे संपन्न झाला, जिथे तज्ञ आहारतज्ञ मालविका करकरे यांनी सर्व सहभागींना आरोग्यदायक आहाराचे महत्त्व विषद केले. प्रमुख नर्सिंग सुपरिटेंडंट शशिकला कामठे यांनी कार्यस्थळी महिलांची सुरक्षा याबद्दल जनजागृती केली आणि एचआर सीनियर मॅनेजर ॲड. शीतल मोरे यांनी कार्य-जीवन संतुलन आणि लिंग समानतेबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाने बागेमधील अनेक लोकांचे लक्ष वेधले, जिथे त्यांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, फोटो काढले आणि सहभागींसोबत त्यांचे विचार देखील व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप नाश्त्याने झाला.
महिला दिनाच्या निमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन
Date: