पुणे- पुण्यातील शास्त्रीनगर चौकात दारूच्या नशेत भररस्त्यात बीएमडब्ल्यू उभी करून लघुशंका आणि अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री सातारा जिल्ह्यातील कराड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्याआधी त्याने एक व्हिडिओ जारी करत माफी मागितली होती.येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक- 168/2025, कलम – 270,281,285,79 BNS सह 110/112 म पो कायदा 184,185 मो वा कायदा 85 दारूबंदी कायदा या गुन्ह्यातील आरोपी गौरव मनोज आहुजा, 25 वर्षे, राहणार – एन आयबीएम रोड, कोंढवा, पुणे यास कराड पोलिसांच्या ताब्यातून घेऊन, वैद्यकीय तपासणी करून पुणे येथे आणण्यात आले. आज 9 मार्च रोजी 07.50 वा जता अटक करण्यात आलेली आहे.
‘मी गौरव आहुजा, माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडले. हे कृत्य खूप वाईट होते. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो. मी मनापासून माफी मागतो, मला माफ करा. मला एक चान्स द्या, सॉरी…’ असे तो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. तसेच , मी पोलिस स्टेशनमध्ये हजर होणार आहे. कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, अशी विनंतीही गौरव अहुजाने केली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाला यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले आहे. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार ( क्रमांक एमएच 12 आरएफ 8419) उभी करत गौरव अहुजाने मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला हटकले असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच श्रीमंत बापाच्या मुलाचे असे कृत्य समोर आल्याने पुण्यात संतापाची लाट उसळली होती. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
या गौरव आहुजाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तो फेब्रुवारी 2021 मध्ये क्रिकेट बेटिंगप्रकरणी अटक झालेला आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने गँगस्टर सचिन पोटेला याच्या टोळीवर कारवाई करत क्रिकेट बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बेटिंगच्या विळख्यात ओढण्यात आले होते. याच प्रकरणात गौरव आहुजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.