लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या सहकार्याने आयोजन
पुणे : भजन हे केवळ भक्तिसंगीत नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. भजनी मंडळातील महिलांची भूमिका ही केवळ गायनापुरती मर्यादित नसून, त्या समाजाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात, अशी भावना व्यक्त करीत पेशवेकालीन श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या वतीने भजनी मंडळातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या सहकार्याने टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीफळ, गुलाबपुष्प आणि साडीचोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.
पासोड्या विठोबा मंदिराचे प्रमुख विश्वस्त रविंद्र फटाले यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, स्वप्निल काळभोर, विनोद मणियार, लायन्स क्लबचे बजरंग आकडे उपस्थित होते.
रोमा लांडे, दिलीप बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. अमर लांडे यांनी आभार मानले.

