पुणे-शनिवार दिनांक ८मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या वेबसाईटचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा.ॲड. अशोक पलांडे यांच्या शुभहस्ते झाले.त्यावेळी संस्थेच्या फायनान्स कंट्रोलर श्रीमती प्राजक्ता प्रधान,संस्था सदस्य श्री.मिलिंद कांबळे,प्रशालेच्या शालासमितीअध्यक्षा मा.डॉक्टर प्रीती अभ्यंकर, मुख्याध्यापिका श्रीमती दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता भोसले,पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती जज्जल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालकप्रतिनिधी , वर्गप्रतिनिधीविद्यार्थिनी उपस्थित होत्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फक्त मुलींसाठी असणाऱ्या अहिल्यादेवी प्रशालेत जागतिक महिलादिनी वेबसाईटचे उद्घाटन अतिशय औचित्यपूर्ण आहे.
शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणार्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीसंचलित, ८६वर्ष विद्यादानाचा अनुभवसंपन्न वारसा लाभलेली ,इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावातही आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवलेली अग्रमानांकित मराठी माध्यमाची ही शाळा असून या वेबसाईटच्या माध्यमातून आधुनिकपद्धतीने तिची ओळख आता आपल्याला होणार आहे.
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स: वेबसाईट उद्घाटन समारंभ संपन्न
Date: