पुणे, 06 मार्च 2025: भारत फोर्जची पूर्ण मालकीची उपकंपनी कल्याणी पॉवरट्रेनने COMPAL ELECTRONICS, INC सोबत भारतात X86 प्लॅटफॉर्म सर्व्हर उत्पादनासाठी कॉमपल इलेक्ट्रॉनिक्स, इंक सोबत तंत्रज्ञान परवाना करार (Technology Licensing Agreement) केला आहे. दोन्ही पक्षांनी भारतात स्थानिक पातळीवर उत्पादन सुविधांचा उपयोग करून सर्व्हर व्यवसाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (MOU) केला असून तो भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगत आहे. कॉमपल कडून KPTL ला सर्व्हरशी संबंधित तांत्रिक मदत पुरवली जाईल. त्यामध्ये स्थानिक उत्पादन, असेंब्ली, चाचणी प्रक्रिया आणि अंतिम विक्रीच्या देखरेखीचा समावेश असेल.
भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (Jt MD) श्री. अमित कल्याणी म्हणाले: “भारतामध्ये सर्व्हर उत्पादनासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कॉमपल कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या सहकार्यामुळे भारताच्या उत्पादनक्षमता वाढीस चालना मिळेल. या प्रस्तावित सहयोगाबाबत त्यांनी कल्याणी ग्रुपवर दाखवलेल्या विश्वासाने आम्ही आनंदी आणि प्रेरित झालो आहोत.”
कॉमपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी बोनाडेरो म्हणाले, “कल्याणी पॉवरट्रेन सोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कॉमपल सक्रियपणे सर्व्हर व्यवसायाचा विस्तार करत असून अनेक भागीदारी प्रस्थापित करत आहे. कल्याणी पॉवरट्रेनचा भारतीय बाजारपेठेतील व्यापक अनुभव आमच्या सहकार्याला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवेल. आम्ही याला सुरुवात मानतो आणि भविष्यात एकत्रितपणे मोठे मूल्य निर्माण करता येतील अशा आणखी ICT संबंधित व्यवसाय संधी निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”
जोडीला, कल्याणी पॉवरट्रेनच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्रातून ‘मेड इन इंडिया’ सर्व्हर सादर करण्याची घोषणा केली.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये नमूद केले की, “हा कारखाना स्थानिक व्यवसायांना चालना देईल, गुंतवणूक आकर्षित करेल आणि या प्रदेशाच्या उत्पादनक्षमता वाढीस महत्त्वपूर्ण योगदान देईल.”
भारताच्या AI, क्लाऊड आणि डेटा सेंटर इकोसिस्टमचा विकास
स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देऊन आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करत हा सहयोग भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सहकार्यातून उद्योग, क्लाऊड सेवा पुरवठादार, हायपरस्केलर्स आणि सरकारी संस्थांना उच्च-कार्यक्षमता, AI वर्कलोड्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि मोठ्या प्रमाणातील डेटा प्रक्रिया करण्यासाठी किफायतशीर सर्व्हर सोल्यूशन्सने सक्षम होतील.

