मुंबई, 6 मार्च 2025: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या लष्करी कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक वेतन पॅकेज देण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याची घोषणा केली. या सामंजस्य करारात वाढीव मोफत व्यापक वैयक्तिक अपघात विमा कव्हर (पीएआय), डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर आणि इतर अनेक ऑफर्ससह विशेष फायद्यांचा समावेश आहे.
4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयात सामंजस्य करारांच्या देवाणघेवाणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीय लष्कराचे महासंचालक (एमपी आणि पीएस) लेफ्टनंट जनरल राजीव पुरी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला मेजर जनरल व्ही.के. पुरोहित, एडीजी पीएस, बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री.सुब्रत कुमार आणि दोन्ही संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय सैन्याला सेवा दिल्याबद्दल लेफ्टनंट जनरल राजीव पुरी यांनी बँक ऑफ इंडियाचे आभार मानले. लष्कराचे प्राबल्य असलेल्या भागात बँकेच्या काही संरक्षण अनुकूल शाखा सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.
बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. सुब्रत कुमार म्हणाले, “भारतीय सैन्याशी जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या रक्षक वेतन योजनेचे फायदे वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे त्यांनी सर्वोत्तम बँकिंग उत्पादने आणि ग्राहक सेवा देण्याची खात्री देतो.” लष्कराच्या निवृत्तीवेतनधारकांनी बीओआय डोअर स्टेप बँकिंगचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. बँक ऑफ इंडियाच्या वतीने त्यांनी भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
बीओआयची रक्षक वेतन योजना ही संरक्षण दल, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास तयार केलेली वेतन योजना आहे. ती 100 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैयक्तिक अपघाती विमा कव्हर, 200 लाख रुपयांचे मोफत हवाई अपघाती विमा कव्हर, तसेच लागू अटी आणि शर्तींसह इतर अनेक विशेषाधिकार आणि सवलती देते.