· प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज हँडलिंगसाठी सशुल्क सेवा
· सहा भारतीय विमानतळांवर डिर्पाचरसाठी नाममात्र शुल्कासह ही सेवा उपलब्ध
गुरुग्राम, ६ मार्च २०२५ – एयर इंडियाने आज ‘झिपअहेड’ ही सशुल्क सेवा लाँच केली असून त्याअंतर्गत भारतात प्रवास करणाऱ्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज सेवेचा लाभ घेता येईल.
एरवी अशाप्रकारची सुविधा उपलब्ध नसलेल्या, परंतु घाई असलेल्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना प्रायोरिटी सेवेचा लाभ घेऊन आपला वेळ वाचवता येण्यासाठी ही सेवा लाँच करण्यात आली आहे. प्रवाशांना ऑन- ग्राउंड टचपॉइंट्सद्वारे ही सेवा घेऊन विमानतळावर चिंतामुक्त राहाता येईल.
‘झिपअहेड’ सेवेचा लाभ घेणाऱ्या एयर इंडियाच्या प्रवाशांना एयरलाइनच्या प्रीमियम इकॉनॉमी चेक- इन काउंटर्सवर चेक इन करता येईल तसेच बॅगेज हँडलिंग सेवेचा वापर करता येईल. सध्या ही सेवा सहा भारतीय विमानतळावर डिपार्चरसाठी उपलब्ध असून त्यात दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता यांचा समावेश आहे. नाममात्र शुल्क भरून ही सेवा घेता येणार आहे.
· रुपये ४९९ : डिपार्चरआधी सहा तास खरेदी केल्यास
· रूपये ६९९ : डिपार्चरपासून सहा तासांच्या आत खरेदी केल्यास
‘झिपअहेड’ सेवा खरेदीसाठी एयर इंडियाची वेबसाइट, मोबाइल अप, एयरपोर्ट टिकिटिंग ऑफिस (एटीओ) यावर डिपार्चरआधी ७५ मिनिटे उपलब्ध असेल.
एयर इंडियाच्या महाराजा क्लब लॉयल्टी प्रोग्रॅमचे प्लॅटिनम आणि गोल्ड सदस्य असलेल्यांना त्यांच्या भाडेशुल्काचा प्रकार किंवा प्रवासाचा क्लास कोणताही असला, तरी या प्रायोरिटी सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे.
‘झिपअहेड’ विषयी अधिक माहिती www.airindia.com वर देण्यात आली आहे.