(निफ्टी AAA फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणूक करणारा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड. मध्यम प्रमाणात व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम.)
फंडाची ठळक वैशिष्ट्ये:· मापदंड: निफ्टी AAA फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्स· अपेक्षित योजना मॅच्युरिटी दिनांक: 31 मार्च 2028· एनएफओ कालावधी: 27 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025· किमान गुंतवणूक: 5,000 रु. आणि त्यानंतर 1 रु. च्या पटीत· फंड व्यवस्थापक: हार्दिक शाह· एक्झिट लोड: शून्य |
मुंबई: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड हाऊसेसपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे‘अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड’यात्यांच्या नवीन फंड ऑफरची (NFO) घोषणा करण्यात आली. हा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड असून तो निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाला मध्यम व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम आहे. हार्दिक शाह (फंड मॅनेजर) यांच्या द्वारे व्यवस्थापित हा नवीन फंड निफ्टी AAA फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्स बेंचमार्कला अनुसरतो. किमान गुंतवणुकीची रक्कम 5,000 रु. असून त्यानंतर 1 रु. च्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाला एक्झिट लोड नाही आणि एनएफओ कालावधी 27 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025 असा असेल.
अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड
या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट म्हणजे शुल्क आणि खर्चाच्या आधी निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्सच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी जवळपास जुळणारा गुंतवणूक परतावा (ट्रॅकिंग एरर/ ट्रॅकिंग डिफरन्स अधीन राहून) प्रदान करणे. मात्र, योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट गाठले जाईल याची खात्री दिली जाऊ शकत नाही.
ही योजना 95% ते 100% पर्यंत निधी इंडेक्सशी संबंधित फिक्स्ड इनकम इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवेल, तर उर्वरित निधी डेब्ट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तरलता राखण्यासाठी गुंतवला जाईल. सविस्तर मालमत्ता वाटप आणि गुंतवणूक धोरणांसाठी कृपया SID पहा.
फंडाच्या ओपन-एंडेड स्वरूपामुळे गुंतवणूकदारांना सुव्यवस्थितपणे गुंतवणूक करता येते. तसेच विड्रॉ सुविधा वापरू शकतात. त्यामुळे त्यांना गरजेनुसार लवचिकतेने योजनेत प्रवेश करता येतो आणि बाहेर पडता येते. रीडेम्शन किंवा पुनर्संतुलन उद्देशासाठी विक्री केली नाही तर ही एक पॅसिव्हली मॅनेज योजना असून Buy and Hold धोरणावर आधारित असून फायनान्शियल सरव्हिसेस क्षेत्रातील डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स मॅच्युरिटीपर्यंत धरून ठेवले जातील.
फंड सादरीकरणाबद्दल बोलताना अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बी. गोपकुमार म्हणाले: “आमच्या वाढत्या पॅसिव्ह डेब्ट ऑफरिंग्समध्ये महत्त्वाची भर असलेला अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या नव्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना फायनान्शियल सरव्हिसेस क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या AAA-रेटेड पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. टार्गेट मॅच्युरिटी स्ट्रक्चरमुळे, गुंतवणूकदारांना स्थिर आणि पूर्वानुमानित गुंतवणुकीचा मार्ग उपलब्ध होईल. जोखीम आणि परतावा यांचे संतुलन राखू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तो आदर्श आहे. आम्ही सातत्याने नाविन्य आणत आहोत आणि आमच्या योजनांचा विस्तार करत आहोत. त्यामुळे हे सादरीकरण आमच्या गुंतवणूकदारांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी किफायतशीर गुंतवणूक उपाय पुरविण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळकटी देते.”
फंडाची मुख्य वैशिष्ट्ये:
• Index YTM: गुंतवणूकदारांना एक अनुमानावर आधारित परतावा प्रोफाइल पुरवत अंतर्निहित निर्देशांकाच्या आधारे स्पष्ट Yield to Maturity (YTM) ऑफर करणे. 25th Feb 2025 पर्यंत निर्देशांकाचा YTM 7.69% आहे.
• कमी खर्चाची पॅसिव्ह गुंतवणूक: सक्रियपणे व्यवस्थापित फंडाशी जोडलेल्या उच्च शुल्काशिवाय फिक्स्ड इनकम मार्केटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सोपी, सुलभ आणि किफायतशीर गुंतवणूक संधी.
• उच्च-गुणवत्तेचा पोर्टफोलिओ: आवश्यक तरलतेसाठी एक छोटा भाग राखीव ठेवत AAA-रेटेड मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून उच्च स्थिरता आणि संरक्षण सुनिश्चित करणे
• सिक्युरिटी निवडीमध्ये कमी पूर्वग्रह (Bias): हा पॅसिव्हली मॅनेज केलेला फंड आहे जो त्याच्या बेंचमार्कचे अनुकरण करतो. त्यामुळे निवड प्रक्रियेत पूर्वग्रह कमी होतो आणि पारदर्शकता आणि सातत्य राखले जाते.
• सोपे आणि सुलभ : फायनान्शियल सरव्हिसेस क्षेत्रातील टार्गेट मॅच्युरिटी पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूकदारांना सुलभता आणि स्पष्टता पुरवणारे सरळ गुंतवणूक धोरण