सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

Date:

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, केंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावी, असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींग, सोसायटी मिटींग, जेष्ठ नागरिकांचे क्लब, झोपडपट्ट्या तसेच शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धती, सुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत, असे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आ.रासनेंना हवेत २ भुयारी रस्ते:शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा..म्हणाले,’ तरच शहरातील कोंडी सुटेल

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव आमदार...

सामान्य माणसाला सत्ताधारी लोकांकडूनच धोका

पुणे- महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता भाजप खासदार रक्षा खडसे...

लोहा फाउंडेशनतर्फे मूकबधिर मुलांच्या शाळेसाठी मदतकार्य 

शिक्षण प्रसारक मंडळीचे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालयात उपक्रम संपन्न  पुणे : आर्थिकदृष्ट्या...

रंगावलीकार चारुदत्त वैद्य यांचा सन्मान

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन तर्फे आयोजन ः ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद...