श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन तर्फे आयोजन ः ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांची उपस्थिती
पुणे : श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या वतीने चारुदत्त वैद्य यांना श्रीरंग कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रंगावलीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
बालगंधर्व कलादालन येथे शिल्पकार प्रमोद कांबळे व ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे प्रा.अक्षय शहापूरकर, अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथणे, महादेव गोपाळे, श्रीहरी पवळे हे उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
चारुदत्त वैद्य हे कलाकार असून त्यांनी नोकरी सांभाळून चित्रकला, रांगोळी चे वर्ग घेतले व त्यामाध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांना व त्यांच्या विद्यार्थ्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या कलाक्षेत्रातील भरीव कामगिरी मुळे त्यांना विविध संस्थांनी सन्मानित केले आहे. तसेच अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणेच्या वतीने त्यांना कला सांस्कृतिक नेतृत्व पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.