लाडकी बहीण:2100 रुपये याच अर्थसंकल्पात देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलंच नाही : अदिती तटकरे

Date:

मुंबई -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana )विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब ( Anil Parab), काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारले. तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अनिल परब आणि सतेज पाटील यांनी 2100 रुपयांच्या संदर्भात प्रश्न विचारले असता जाहीरनामा 5 वर्षांचा असतो असं उत्तर अदिती तटकरे यांनी दिलं. आहे

लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही दर दिवशी बोलत असतो. ही लक्षवेधी लाडक्या बहिणींची आहे. किती बहिणी अपात्र होणार आहेत किंवा निकष आधी का लावले गेले नाहीत? असा प्रश्न करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरले. या योजनेसाठी जी तरतूद गरजेचे होती, ती केली गेली का? पण आता महिलांना अपात्र करत आहात. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचा लाभ काही महिला घेत आहेत. म्हणजे सरकारची फसवणूक केली जात आहे. यावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल देखील परब यांनी उपस्थित केला. सरकार कारवाई करणार का? ज्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या पैशांचा अपव्यय केला आहे, ते दोन्ही लाभ देऊन त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात? असा सवालही त्यांनी केला. अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहिणांनी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, ते 2100 रुपये कधी देणार असा सवालही परब यांनी उपस्थित केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलं नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या. राज्य सरकार एखादी योजना जाहीर करत असतो. 100 टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन आणेल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असे सुळे म्हणाल्या.

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या. आधीपासून टीका होत राहिली पण महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

2 कोटी 63 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. तपासणीची प्रक्रिया ऑगस्टपासून आम्ही सुरुवात केली होती. संजय गांधी निराधार योजनेतील डेटा आम्हाला प्राप्त झाला, त्यात 1 लाख 97 हजार महिलांचा डेटा आला आहे. ही प्रक्रिया सुरु होती म्हणून तसे अर्ज झाले तसा डेटा प्राप्त होत गेला. सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा 2 लाख 54 हजार निराधार योजनेचा डेटा आम्हाला मिळाला असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आचारसंहिता होती म्हणून तपासणी प्रक्रिया बंद होती. डेटा आम्ही स्वतः परस्पर करत नाही. इतर विभागाकडून आम्हाला डेटा येतो असेही तटकरे म्हणाल्या. त्या त्या पद्धतीने कारवाई करत आम्ही गेलो.

लाडक्या बहिणीचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हप्ते काढले होते त्यावेळी देखील निकषात बदल केले नव्हते. स्थानिक पातळीवर आम्हाला जशा तक्रारी आल्या, तशी करवाई आम्ही करत गेलो असे तटकरे म्हणाल्या. RTO वरुन जो डेटा मिळाला तशी कारवाई केली गेली आहे. जुलैमध्ये 5 लाख महिला अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते. तेव्हा आपण आधी प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर महिलांना खात्यात लाभ दिला गेला असेही तटकरे म्हणाल्या. 21 ते 65 वय असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. 65 नंतरच्या महिला बाद केल्या जातील असेही तटकरे म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक सॅलरी पॅकेज देण्यासाठी बँक ऑफ इंडियाने भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार केला

मुंबई, 6 मार्च 2025: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ...

एयर इंडियातर्फे इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी ‘झिपअहेड’ प्रायोरिटी चेक- इन आणि बॅगेज हँडलिंग सेवा

·         प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज हँडलिंगसाठी सशुल्क सेवा ·         सहा...