मुंबई, दि. ५ : सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गाव, पाड्यांतील इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दि. ३१ मे २०२५ आहे पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कस्तुरबा महानगरपालिकेचे मराठी शाळा क्र.२ सभागृह हॉल तळमजला बोरिवली पूर्व, मुंबई येथे संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.