मुंबई,: बँक ऑफ इंडिया (BOI) ने देशभरात 111 नवीन शाखांचे उद्घाटन करून आपल्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या शाखांचे आभासी उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रजनीश कर्नाटक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या माध्यमातून बँकेने आर्थिक समावेशन आणि ग्राहकांसाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या बांधिलकीला बळकटी दिली आहे.
नवीन उद्घाटन झालेल्या शाखा अनेक शहरांमध्ये पसरलेल्या असून, बँक ऑफ इंडियाच्या देशव्यापी उपस्थितीला आणखी बळकटी मिळाली आहे. हैदराबाद FGMO मध्ये (Field General Manager Office) सर्वाधिक वाढ झाली असून, 17 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. चेन्नई FGMO मध्ये 14 नवीन शाखांसह लक्षणीय विस्तार झाला आहे. पुणे FGMO मध्ये 13 नवीन शाखा, तर नवी दिल्ली FGMO मध्ये 12 नवीन शाखा सुरू झाल्या आहेत. भोपाळ FGMO मध्ये 11 नवीन शाखांचा समावेश झाला आहे. चंडीगड आणि लखनौ FGMO यांनी प्रत्येकी 10 नवीन शाखांचे उद्घाटन केले आहे.
विस्ताराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक म्हणाले : “या विस्तारामुळे प्रमुख शहरी आणि निमशहरी भागांमध्ये आमची उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे, ज्यामुळे बँकिंग सेवा ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचतील. शाखा नेटवर्क वाढवून आम्ही ग्राहकांसाठी सुलभता सुधारणे, त्यांना अधिक वैयक्तिकृत बँकिंग अनुभव देणे आणि सेवा सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही लघू व्यवसायांना पाठबळ देणे आणि व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे यासाठी वचनबद्ध आहोत. हा उपक्रम आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या आणि देशाच्या आर्थिक वाढीत योगदान देण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”