श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजन ; जय गणेश रुग्णसेवा अभियान
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे आयोजित शिबीरात ९०० रुग्णांची नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळ सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिबीरात ७६३ रुग्णांची नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप तर नेत्र आजार विविध शस्त्रक्रिया १०३ रुग्णांच्या करण्यात आल्या. अलायन्स क्लब ऑफ पुणे, एच व्ही देसाई नेत्रालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजित करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, अनेक वर्षांपासून जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत विविध शिबीरांचे आयोजन करण्यात येते. शिबिरात मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, आय ड्रॉप्स वाटप तसेच मोफत मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे कार्य सातत्याने सुरु असून गरजूंनी ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.