पुणे-
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. एका अर्थाने त्यांनी पिदितेने विरोध केलाच नाही असे म्हटल्याने गोंधळ उडाला होता आणि फिर्यादी महिलेची नाहक बदनामी सुरु केली गेली कि काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला एवढेच नव्हे तर संतापही व्यक्त होऊ लागला होता.आरोपीच्या वकिलाचे तर कामच आही , फिर्यादीचे म्हणणे खोटे ठरवून आरोपीला वाचविणे, आरोपीच्या वकिलांच्या मिडिया बाईट नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वकील असलेल्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनीही’पुणे नाहकच बदनाम झाले‘ अशी एक पोस्ट सोशल मिडियावर केली असल्याने स्वारगेट प्रकरण नेमके सत्याच्या /असत्याच्या कि राजकीय मार्गावर चाललेय हे अनेकांना कळेनासे झाले असल्याचा दावा केला जातोय . त्यात सारे काही झाल्यावर परिवहन राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी आजतागायत स्वारगेट स्थानकाच्या दुर्दशेची आणि अशा अंधाऱ्या गुन्ह्यांना पूरक ठरणाऱ्या जागांची दखल घेतली नव्हती वा पाहणी केली नव्हती त्यांनी देखील बैठक घेऊन परिवहन खात्यात आयपीस अधिकारी नियुक्तीचे आदेश काढल्याचे वृत्त आहे. एकूणच या प्रकारात आता राजकारण घुसल्याने सत्ताधारी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून स्वतःचा बचाव तर करू पाहत नाही ना? असाही प्रश्न कोणी उपस्थित केला तर नवल वाटणार नाही.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली घटना स्ट्रगल किंवा फोर्सफुली घडलेली कृती नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने प्रतिकार न केल्याने कुणालाही शंका आली नाही. परिणामी, आरोपीला गुन्हा करता आला, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. परिणामी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे येत स्थितीवर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यानंतर योगेश कदम यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण संमतीच्या शारीरिक संबंधांचे असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही त्यांच्या या दाव्याची अप्रत्यक्षपणे पुष्टी करणारे विधान केले आहे.पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे (25 फेब्रुवारी) एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हे प्रकरण दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उजेडात आले आणि एकच खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाची वेगवान चक्रे फिरवून आरोपीला अटक केली. या प्रकरणी कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण बलात्काराचे नव्हे तर संमतीच्या शारीरीक संबंधांचे असल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा सरकारी पक्षाचे खोडून काढला.पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही अप्रत्यक्षपणे असाच दावा केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे तसे संकेत दिलेत.रुपाली पाटील ठोंबरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, पुणे शिवाजी कोर्टात बसस्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी dcp गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली.
मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल,आरोपीला काळे फसणार करणार असेल तर प्लीज करू नका. त्याचवेळी साहेबांना सांगितले, घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे. केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे.पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो. दुसरे बसस्टँड आगराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला. आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


