पुणे. लोकमान्य नगर.. द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव मित्र परिवाराच्या वतीने पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना आणि पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने लोकमान्य नगर. सदाशिव पेठ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बॉडी बिल्डिंग जिमचा कमलेश आचरा हा मानाच्या “पुणे श्री २०२५ चा मानकरी ठरला.
वुमेन्स फिजिक श्री २०२५.”ची मानकरी माय टी फिटनेस जिमची यशोदा भोर ठरली. तर “आमदार हेमंतभाऊ रासने श्री २०२५” चा किताब ए बी एस जिमचा आकाश दडमल” याने पटकावला.
देशात एका जिल्हास्तरीय स्पर्धेत पाच टायटल देणारी, स्पर्धेत पाच लाख रुपयांची पारितोषिके देणारी, सर्वात जास्त स्पर्धक सहभागी असणारी देशातील हि एकमेव शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली.
पुणे श्री २०२५ चा मानकरी ठरलेल्या कमलेश आचरा यास मानाची आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम २५५५५/- (पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
“ना. चंद्रकांतदादा पाटील द हिंदू श्री २०२५ चा मानकरी जी एस फिटनेस जिमचा विशाल सुरवसे” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
ना. मुरलीधर मोहोळ मेन्स फिजिक्स श्री २०२५ रोहन गोगावले ” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
“ना. माधुरीताई मिसाळ वुमेन्स फिजिक श्री २०२५.
ची मानकरी ठरलेल्या यशोदा भोर हिस आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र. आणि “आमदार हेमंतभाऊ रासने श्री २०२५ चा मानकरी ठरलेल्या ए बी एस जिमचा आकाश दडमल” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा) रुपयाचा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले.
स्पर्धेत एकूण पाच लाख रुपयाची वेगवेगळी बक्षीसे धनादेशा द्वारे देण्यात आली.
बॉडी बिल्डरचे ५५ किलो ते ८० किलो वरील असे सात गट. मेन्स फिजिक चे दोन गट आणि वूमेन्स फिजिक चा एक अशा १० गटात अनुक्रमे १ ते १० क्रमांक विजेत्यातील प्रथम क्रमांक विजेत्यास ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ) पासून ते दहाव्या क्रमांक विजेत्यास १३३३/-
( एक हजार तीनशे तेहतीस ) रुपयाचा धनादेश, अप्पर ट्रॅक, टीशर्ट
प्रोटीन आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
"बेस्ट पोझर" ठरलेल्या ऋषिकेश भोसले आणि मोस्ट इंप्रूव्हड चा मानकरी ठरलेल्या वर्ल्ड ऑफ फिटनेस जिमचा निलेश धोंडे या दोघा पारितोषिक विजेत्यास ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ) चा धनादेश, आकर्षक ट्रॉफी देउन गौरवण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या १९० शरीर सौष्ठव पटूस टी शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात आली.
स्पर्धेतील प्रमुख बक्षीस वितरण कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. तसेच माजीनगरसेवक राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिलीप काळोखे, स्मिता वस्ते, भाजप पदाधिकारी गणेश घोष, पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष झंजाड, प्रमोद कोंढरे, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे. उमेश शाह, उदय लेले, शैलेश लडकत, विशाल पवार, माधव साळुंके, संजय गावडे, महेंद्र चव्हाण, सुरज लोखंडे, राजेश धोत्रे, प्रशांत हरसुले, राजाभाऊ देशमुख, पृथ्वीराज भिंताडे, जयंत देशपांडे, श्रेयस रासने, सचिन जामगे, डॉ पराग नवलकर, बंडोपंत फडके, रामा एरंडे आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली.
स्पर्धेचे आयोजन मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी केले होते.
स्पर्धेत सूत्रसंचालन राजेंद्र नांगरे आणि शंतनू खिलारे यांनी केले.
मुस्तफा पटेल, प्रशांत जगताप. नवनाथ शिंदे. सागर येवले. दिलीप धुमाळ यांनी पंच म्हणून काम पाहिले.
आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.

