पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर व देसाई ब्रदर्स गु्रप ऑफ कंपनीज् यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 28) अपंग आणि मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजभवना जवळील बालकल्याण संस्थेत या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत 3234 डी-2 चे उपप्रांतपाल-1 राजेश अग्रवाल, माजी प्रांतपाल सी. डी. शेठ, लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरच्या अध्यक्षा श्रद्धा हाटे, ॲक्टिव्हिटी चेअरमन सतीश शहा, ॲक्टिव्हिटी को-ऑर्डिनेटर दीपक दोशी, सचिव मिलिंद तलाठी, कोषाध्यक्ष संयोगिता शहा, देसाई ब्रदर्स गु्रप ऑफ कंपनीज्चे संचालक उमेश पारेख, बालकल्याण संस्थेच्या प्रमुख अपर्णा पानसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. गेल्या 29 वर्षांपासून स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनेक शहरांमधून आणि ग्रामीण भागातून एकूण 150 स्पर्धक सहभागी झाले होते.
राजेश अग्रवाल यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून लायन्स क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रास्ताविकपर स्वागत लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरच्या अध्यक्षा श्रद्धा हाटे यांनी केले. स्पर्धेस देसाई ब्रदर्सचे चेअरमन नितीन देसाई यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रमेश विपट, अभिजीत तांबे, भूपेंद्र आचरेकर, शशांक कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. प्रकाश नारके आणि सुजाता दोशी यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद तलाठी यांनी आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
16 वर्षाखालील मुले (ऑटिझम) – प्रथम : आदिराज उल्हे, द्वितीय : रुद्र पुराणिक, तृतीय : रुद्र चव्हाण
16 वर्षाखालील मुली (ऑटिझम) – प्रथम : आदिती गाडे, द्वितीय : नव्या शार्दुल
16 वर्षावरील मुले (मतिमंद) – प्रथम : आर्य दिवाण, द्वितीय : दर्शन खंडागळे, तृतीय : राहुल केदार
16 वर्षावरील मुली (मतिमंद) – प्रथम : साक्षी सुतार
16 वर्षाखालील मुली (मतिमंद) – प्रथम : वैदेही भाटवडेकर
16 वर्षाखालील मुली (अंध) – प्रथम : देवदास पारधी, द्वितीय : देवा शुक्रे, तृतीय : बाबासाहेब वाघमारे
16 वर्षाखालील मुले (कर्णबधीर) – प्रथम : राज गायकवाड, द्वितीय रुणीत शिगवण, तृतीय : जितू चौधरी
16 वर्षाखालील मुली (कर्णबधीर) – प्रथम : श्रुती जगदाळे, द्वितीय : संध्या सूर्यवंशी, तृतीय : आराध्या सूर्यवंशी
16 वर्षावरील मुले (कर्णबधीर) – प्रथम : संकेत तुळे, द्वितीय : रवी कुमार, तृतीय : श्रेयस खोडले
16 वर्षावरील मुली (कर्णबधीर) – प्रथम : गायत्री जगदाळे

