पुणे-
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हे आदेश दिले.
स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. गेल्या चार दिवसांपासून आरोपी गाडे याचा पोलीस शोध घेत होते. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून त्याला आज (दि. 28 ) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यालयाने आरोपी दत्ता गाडेने याला 12 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने यांनी पोलिस कोठडीत टाहो फोडला आहे. माझे चुकले, मी पापी आहे, असे म्हणत तो रडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही. असा दावाही आरोपीने यावेळी केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

