पुणे, २५ फेब्रुवारी २०२५: टायटनचा प्रीमियम हॅन्डबॅग ब्रँड, ‘अर्थ’ने आपले तिसरे एक्सक्लुसिव “यलो डोअर” पुण्यामध्ये सुरु करून पश्चिम भारतात आपल्या रिटेल विस्ताराची घोडदौड कायम ठेवली आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या एक्सक्लुसिव्ह स्टोरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुण्यामध्ये विमान नगरमधील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये सुरु करण्यात आलेले जवळपास ५५० चौरस फुटांचे नवीन स्टोर म्हणजे ‘अर्थ’च्या धोरणात्मक विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
पुण्यातील ग्राहकांची उत्तम क्रयशक्ती, जोमात असलेले आयटी क्षेत्र आणि युवा नोकरदार, व्यावसायिकांची वाढती लोकसंख्या यामुळे या शहरातील रिटेल बाजारपेठेची छान भरभराट होत आहे, या उत्साहजनक रिटेल बाजारपेठेचा लाभ घेण्याच्या धोरणात्मक उद्देशाने ब्रँडने आपले एक्सक्लुसिव स्टोर याठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे दुसरे सर्वात मोठे शहरी केंद्र आणि खूप महत्त्वाचे तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक महिलांचे आणि फॅशनच्या बाबतीत चोखंदळ ग्राहकांचे प्रमाण जास्त आहे, ‘अर्थ’ च्या प्रीमियम हॅन्डबॅन्ग उत्पादनांसाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे.
अतिशय सुबक, आकर्षक आणि आनंददायी वातावरण असलेले, ‘अर्थ’ स्टोर भारतीय महिलांसाठी आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रस्तुत करते. “पॉकेट्स ऑफ जॉय” या मूलभूत संकल्पनेवर आधारित असलेले हे स्टोर आपल्याला एका वेगळ्या जगाची सफर घडवते. नवीन उत्पादने, भेट देण्यासाठी उपयुक्त आणि प्रत्येक बॅगमधून मिळणारा छोटा–छोटा आनंद, प्रत्येक दिवस आनंदाने, सहजपणे जगता यावा यासाठी डिझाईन करण्यात आलेली उत्पादने या सर्व गोष्टी ठळकपणे स्टोरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
मिनिमल आणि नीटनेटकी सुंदर रचना, स्पर्शाची वेगळी अनुभूती देणारे टेक्श्चर्स आणि मजेशीर घटक यांचा आकर्षक मिलाप असलेले ‘अर्थ’ स्टोर अगदी सहजसोप्या खरेदीला अजून जास्त आनंददायी बनवते. याठिकाणचा प्रत्येक तपशील एक सुखद आश्चर्य आहे, आमच्या बॅग्सचे सौंदर्य आणि उपयुक्तता त्यामधून प्रदर्शित होते, “पॉकेट्स ऑफ जॉय” प्रत्यक्षात साकार करणारा खरेदीचा अनुभव याठिकाणी मिळतो.
टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स अँड ऍक्सेसरीज डिव्हिजनचे सीईओ श्री मनीष गुप्ता यांनी सांगितले, “पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी १० आउटलेट्स सुरु करून आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत जवळपास १०० स्टोर्स सुरु करण्याची व्यापक योजना आहे. सुरुवातीला आम्ही पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आमची अपेक्षा आहे की, मार्च २०२५ पर्यंत ‘अर्थ’ च्या एकंदरीत विक्रीमध्ये एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे योगदान जवळपास १५ ते २०% असेल. ब्रँड स्टोर्स सुरु करणे हा आमच्या रिटेल धोरणातील महत्त्वाचा भाग आहे. रिटेल विस्तार करत असताना एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सची संख्या वाढवण्याची आमची योजना आहे, सुरुवातीच्या स्टोर्सना मिळत असलेले यश आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. येत्या आर्थिक वर्षांमध्ये पुढील टप्प्यातील स्टोर्ससाठी टायटन फ्रॅन्चायजी मॉडेलचा वापर करेल अशी अपेक्षा आहे. आमच्या वृद्धी योजनेच्या पुढील टप्प्यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी बाजारपेठांचा समावेश केला जाईल.”
हे नवीन स्टोर ‘अर्थ’ ब्रँडचे महाराष्ट्रातील स्थान अधिक मजबूत करेल, पुण्यामध्ये हे त्यांचे पहिले स्टोर आहे. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारतभर १०० स्टोर्स सुरु करण्याच्या या ब्रँडच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक पाऊल आहे. प्रीमियम फॅशन ऍक्सेसरीजची आणि विचारपूर्वक घडवण्यात आलेल्या उत्पादनांची प्रचंड आवड असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण ‘अर्थ’ पुढे देखील सुरु ठेवेल.

