पुणे-– सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड ने रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आपला बहुप्रतिक्षित असा “नर्स ३६०° मास्टर क्लास” यशस्वीपणे पार पाडला. नवा पायंडा पाडणाऱ्या या कार्यक्रमाची रचना नर्सिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या गरजांचे पूर्वानुमान आपणहून काढता यावे, नवनव्या आरोग्यसमस्या हाताळता याव्यात आणि धोके दूर ठेवता यावेत यासाठी त्यांना अत्यावश्यक कौशल्यांनी सुसज्ज बनविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. आरोग्यसेवेशी निगडित सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षितता, सर्वोत्कृष्टता आणि परिवर्तनात्मक देखभालीच्या संस्कृतीची जोपासना करण्यावर या कार्यशाळेमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले.
प्रमुख इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजिशियन व आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप डिकोस्टा यांच्या नेतृत्वाअंतर्गत काम करणाऱ्या समर्पित टीमने नर्सिंग विभागाच्या उप महासंचालक श्रीम. आर्या कुलकर्णी व सह्याद्रि हॉस्पिटल्सची आयसीयू टीम यांच्या साथीने अत्यंत काटेकोरपणे या उपक्रमाचे आयोजन केले. या मुख्य टीमला आयोजक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी पाठबळ पुरविले, ज्यात चीफ पॅट्रन म्हणून संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री अब्रारअली दलाल यांचा समावेश होता. को- पॅट्रन म्हणून समूहाचे सीओओ व वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक डॉ. सुनिल राव आणि वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख डॉ. भारत सिंग यांचा समावेश होता. त्याचबरोबर सायन्टिफिक कन्टेन्ट समितीचे सदस्य डॉ. विक्रम आमले, डॉ. प्रतिभा पटेल, डॉ. मनिषा पवार आणि डॉ.राजेश गावडे तसेच सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. सुयश गंधे, श्री. निलेश चिले, श्रीम. मोनाली जाधव, श्री. विशाल शेडगे आणि श्री. कलीम यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनात आपले योगदान दिले.
प्रमुख इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजिशियन व आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप डिकोस्टा “क्रिटिकल इंटेग्रिटी – एथिक्स इन एक्शन” या विषयावरील यावेळी बोलताना म्हणाले, “नर्स 360o मास्टर क्लासने नर्सिंगच्या शिक्षणाचा एक नवा मापदंड निश्चित केला आहे. दैनंदिन नर्सिंग कार्यपद्धतींमध्ये अँटिसिपेटरी कौशल्यांना समाविष्ट करत, आपण रुग्णाची सुरक्षितता आणि त्याला मिळणारे परिणाम यांत लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकतो. या परिवर्तनकारी दृष्टिकोनामुळे नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती सक्रिय रुग्णसेवा पुरविण्यासाठी केवळ सुसज्जच नव्हे, तर इतरांच्या पुढे राहतील याची हमी मिळते”
या मास्टरक्लासमध्ये कार्यशाळांचा एका सर्वसमावेशी संच प्रस्तुत केला गेला, ज्यात तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यक्ष कामाचा अऩुभव देणारी वर्कस्टेशन्स, सामूहिक उपक्रम आणि ईसीजी चॅलेंज व एबीसी चॅलेंजसारख्या रोचक आव्हानात्मक स्पर्धांचा समावेश होता. यामध्ये इन्ट्युबेशनच्या प्रगत पद्धती आणि संकटकालीन व्यवस्थापनापासून ते आयसीयूमध्ये उद्भवणाऱ्या नैतिक पेचांपर्यंत विविध विषय हाताळण्यात आले. सहभागींना अनुकरणीय रुग्णसेवा पुरविण्यासाठी आवश्यक त्या दूरदृष्टी व कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या हेतूने या सर्व विषयांची आखणी करण्यात आली होती.
कार्यक्रमाचा समारोप काही मौजमजेच्या व शैक्षणिक आव्हानांच्या मालिकेने झाला, ज्यातून शिकलेल्या गोष्टींची उजळणी तर झालीच पण त्याचबरोबर सांघिक सहकार्य आणि परस्परांच्या कामांची समज वाढण्यासही प्रोत्साहन मिळाले. य उपक्रमाला सहभागींकडून मिळालेला उदंड सकारात्मक प्रतिसाद म्हणजे हा उपक्रम प्रगत अँटिसिपेटरी कौशल्यांच्या माध्यमातून रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळवून देण्याचा आपले हेतू साध्य करण्यात यशस्वी झाल्याचे द्योतक होता.

