पुणे- राजकीय सुंदोपसुंदी त अडकवीला गेलेला कात्रज -कोंडव रस्त्याच्या प्रारंभाच्या चौकातला भूसंपादनाचा प्रश्न महापालिकेच्या प्रशसकीय कारकिर्दीत अखेरीस मार्गी लागला . आज हि जागा महापालिकेने गुगळे नामक मालकाला योग्य मोबदला देऊन ताब्यात घेतली आता कात्रजच्या मुख्य चौकातील वाहतूक बऱ्याच अंशी सुरळीत होण्यास या मुळे मार्ग मोकळा होणार आहे.
वर्षानुवर्ष म्हणजे जवळ जवळ तब्बल २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या कात्रज मुख्य चौकामध्ये वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या स.नं.१/२ ब (पैकी) येथील ६०० मीटर डी.पी. रस्त्याने बाधित मिळकतीचे भूसंपादन कायद्यान्वये ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालीका आयुक्त डॉ.राजेन्द्र भोसले व अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांचे मार्गदर्शनाखाली
भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीमती प्रतिभा पाटील, उपअभियंता दिंगबर बीगर, शाखा अभियता रुपाली ढगे, आरेखक संतोष शिंदे तसेच मा. विशेष भूमि संपादन अधिकारी क्र १६ पुणे हर्षद घुले व अजिक्य पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे आज दिनांक २५/०२/२०२५ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.
सदरची मुख्य चौकातील जागा पुणे मनपाच्या ताब्यात आल्यामुळे कात्रज – कोंढवा या मुख्य रस्त्यावरील तसेच कात्रज मुख्य चौकातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.महापालिकेच्या अनेक मुख्य सभेत या प्रश्नावरून रणकंदन पेटत असत . पण आता प्रशासकीय कारकिर्दीत हा प्रश्न सुटल्याने इथल्या राजकीय सुंदोपसुंदीचा मुखवटा देखील चाणाक्ष नागरिकांच्या समोर आला आहे.