पाकिस्तानचा संघ ४९.४ षटकांत २४१ धावांवर ऑलआउट झाला. खुशदिल शाह ३८ धावा करून बाद झाला. त्याला विराट कोहलीने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. कोहलीने एकदिवसीय सामन्यात त्याचा १५८ वा झेल घेतला.
४९ व्या षटकात पाकिस्तानने आपला ९ वा बळी गमावला. येथे हरिस रौफ ८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला. या डावात धावबाद होणारा तो दुसरा फलंदाज आहे.

पाकिस्तानने भारताला २४२ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाकडून सौद शकीलने एकमेव अर्धशतक झळकावले. त्याने ६२ धावा केल्या आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (४६) सोबत १०४ धावांची भागीदारी केली.
सलामीवीर बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम-उल-हक (१० धावा) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध खालच्या मधल्या फळीलाही अपयश आले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने २ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना १-१ यश मिळाले. २ फलंदाज धावबाद झाले. विराट कोहली १५८ झेल घेऊन सर्वाधिक एकदिवसीय झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (१५६ झेल) यांना मागे टाकले.

सलामीवीर बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम-उल-हक (१० धावा) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध खालच्या मधल्या फळीलाही अपयश आले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने २ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना १-१ यश मिळाले. २ फलंदाज धावबाद झाले.

पाकिस्तानने टॉस जिंकला असली तरी भारताने यावेळी सामन्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवला. पाकिस्तानने संयतपणे सुरुवात केली होती. बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी यावेळी ४१ धावांची सलामी दिली. पण त्यावेळी हार्दिक पंड्या भारताच्या मदतीला धावून आला. हार्दिकने बाबरला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षर पटेलने अचूक थ्रो करत इमाम उल हकला रन आऊट केले. त्यावेळी भारत पाकिस्तानवर अंकुश ठेवेल, असे वाटत होते. पण त्यावेळी मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्यावेळी अक्षर पटेल भारताच्या मदतीला धावून आला.अक्षर पटेलने यावेळी रिझवानला क्लीन बोल्ड केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. रिझवानला यावेळी ४६ धावा करता आल्या. पण दुसरीकडे सौद शकीलने मात्र अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची भारताला जास्त गरज होती. यावेळी भारताच्या मदतीला धावून आला तो हार्दिक पंड्या. हार्दिकने भारताला दुसरे यश मिळवून देत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. सौद शकीलला यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ६२ धावा कराव्या लागल्या. त्यामुळे पाकिस्तानला भारताला २४१ धावांत रोखता आले. भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आता एकच गोष्ट करावी लागणार आहे. ती गोष्ट म्हणजे दमदार फलंदाजी. कारण दुसऱ्या डावात खेळपट्टी आणखीन संथ होत जाणार आहे, त्यामुळे फलंदाजी करणे भारतासाठ सोपे नसेल. त्यामुळे भारतीय फलंदाज यावेळी कशी कामगिरी करतात, यावर त्यांचा विजय अवलंबून असणार आहे.

हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, भारताने बांगलादेशला पराभूत केले होते. आता जर पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना भारताविरुद्ध जिंकावे लागेल. जर पाकिस्तान भारताविरुद्ध हरला तर पुढच्या फेरीत पोहोचण्याच्या त्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात येतील.बाबर आझमने पाकिस्तानकडून दमदार सुरुवात केली होती. बाबरने गेल्या सामन्यातही अर्धशतक झळकावले होते पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे सर्वांनी त्याला लक्ष्य केले. यावेळी बाबरने हे होऊ दिले नाही आणि येताच त्याने काही आश्चर्यकारक चौकार मारले. त्याने तीन उत्कृष्ट चौकार मारले, विशेषतः कव्हर ड्राइव्हवर. तो चांगल्या लयीत दिसत होता पण हार्दिकने नवव्या षटकात त्याची विकेट घेतली आणि त्याला डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यापासून रोखले. बाबरने २६ चेंडूत २३ धावा केल्या.
