शिवरायांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे सांगितले नाही
मुंबई-एकनाथ शिंदेंची शिवसेना नाहीतर त्यांची गद्दार सेना आहे, तिकडे गेलेल्या लोकांवर मी काहीच बोलणार नाही. ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, असे जुने शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात आणि देशात जी अराजकता पसरली आहे ती दूर करत आपले खरे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. काँग्रेसचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो असे संत गाडगेबाबा यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली दशसुत्री मी मुख्यमंत्री असताना तो खरा धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे काही शिकवले नाही. जे देशाला आपले मानतात ते आपलेच आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, धर्माचा ज्यांनी खेळखंडोबा केला आहे त्यांचे राजकारणापुरते मुस्लीम प्रेम कसे आहे याचे मी दाखले तुम्हाला देऊ शकते. निवडणुकीसाठी हे जे सुरू आहे ते देशाला चांगल्या दिशेने नेईल असे मला वाटत नाही. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदुत्व आहे? का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. माझ्या हिंदुत्वाची व्याख्या व्यवस्थित आहे भाजपचे काय?
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याबद्दल 3 वर्षे होऊन सुद्धा न्यायालयाचा निकाल लागत आहे. न्यायाधिशांची कारकीर्द पूर्ण झाली तरी आमचा निकाल लागलेला नाही. याबाबतील निकाल लागला आहे तर प्रत नार्वेकरांना द्यावी.