पुणे-दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचा १०३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री.उमाकांत वालगुडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी इ-लर्निंग स्कुल, , पुणे येथे सभासदांच्या गुणवंत विदयार्थी पाल्यांचा गुणगौरव, संस्थेच्या वतीने सभासद विविधकल्याणकारी कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रमुख पाहुणे श्री. ईश्वर दास,यांच्या विद्यार्थ्यांचा चेक व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. नागेशकुमार नलावडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.संस्थेची३००० सभासद संख्या असून राज्यभर कार्या क्षेत्र आहै औरंगाबाद कल्याण ,मुंबई येथे शाखा असून खेळते भांडवल १०३ रू. कोटी आहे ४.५२ कोटी ढोबळ नफा असून अ दर्जा प्राप्त आहे दरवर्षी १३% लाभांश दिलि जातो संस्थेच्या वतीने विवीध उपक्रम राबविले जातात.यावेळी प्रमुख पाहुणे ईश्वदास यानी विशेष मार्गदर्शन केले याप्रसंगी वृषाली दाभोळकर ,संदीप गुंजकर ,नितीन कदम , किशोर गवळी उपस्थित होते . सभासद व पाल्यांनी सूरताल संध्या नृत्यगायन सादर केले.
संस्थेने या वेळेस आपल्या देशाची सेवा करणारे कमांडट मिलिटरी हॉस्पिटलचे प्रमुख पाहुणे कर्नल मा.श्री. ईश्वरदास संस्थेच्या कार्याचा गौरव केला, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सभासद व विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गणेश भोज यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप गुळुंजकर यांनी केले
पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचा १०३ व्या वर्धापनदिन उत्साहात
Date:

