पुणे, २२ फेब्रुवारी : अलार्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जीवनरक्षक प्रथमोपचार आणि ह्दय व रक्तवाहिन्यासंबंधी पुनरूत्थानाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अलिकडच्या काळात तरूणांमध्ये ह्दयविकाराच्या झटक्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश्य होता. हृदयविकाराच्या झटक्या सारख्या आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी त्यांना जीवनरक्षक कौशल्यांनी सुसज्य करणे हा देखील यामागचा उद्देश होता.
हे प्रशिक्षण अलार्ड विद्यापीठाच्या आलर्ड स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्सेस विभागाने आयोजित केले होते. या वेळी कार्यशाळेचे उद्घाटन स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्सेसचे डीन डॉ. अजय कुमार जैन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अलार्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. एल.आर. यादव, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे डीन डॉ. डी.के. त्रिपाठी, गणिताचे प्रा.डॉ.एस.के.श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मध्ये सौदत्त हॉस्पिटल आणि संजीवनी हॉस्पिटलमधील डॉ. हिमानवी कंवर, डॉ. स्वप्नील बिराजदार आणि श्री. शंभू यांच्यासह प्रख्यात वक्त्यांनी सीपीआर आणि दैनंदिन जीवनात त्याचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. आयोजित कार्यशाळेत सुमारे ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळाली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समर्पित टीमने केले.
कार्यशाळेच्या सत्रांमध्ये अशा पीडितांसाठी मुलभूत जीवन आधारावर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये छातीवर दाब, पीडितांना रूग्णालयात सहजतेने हलवण्याची तयारी आणि अपघात झाल्यास प्रथमोपचार यांचा समावेश होता.
बीएलएस ही एक व्यावहारिक जीवनरक्षक तंत्र आहे जी सीपीआर, प्रथमोपचार आणि हृदयविकार सारख्या आपत्कालीन परिस्थितीत जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर महत्वाच्या कौशल्यांचे संयोजन करते. तसेच सीपीआरचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये जलद आणि प्रभावी सीपीआरचे महत्व अधोरेखित करण्यात आले. धोक्याची चिन्हे कशी ओळखावीत, परिस्थितीचे त्वरित मूल्यांकन कसे करावे आणि व्यावसायिक वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत त्वरित काळजी कशी घ्यावी या बद्दल एक व्यावहारिक प्रात्यक्षिक देखील देण्यात आले.
या पैकी बहुतेक अचानक हल्ले रूग्णालयाबाहेर होतात, म्हणून आरोग्यसेवा पुरवठादार म्हणून समाजाला सीपीआर स्मार्ट बनवणे हे आपले कर्तव्य बनते. सीपीआरमुळे कोणत्याही पीडितेचे जगण्याची शक्यता वाढू शकते.
या मध्ये डॉ. सविता पेटवाल, डॉ. दिशा सेंजालिया, आशिष यादव, डॉ. गरिमा साहू आणि रितू निकम यांचा समावेश होता.
या कार्यशाळेने विद्यार्थ्यांची बीएलएस आणि सीपीआर मॅन्युअलची समज वाढवलीच, शिवाय ती समृद्ध ही केली. खरं तर जेव्हा गरज असेल तेव्हा कोणाचाही जीव वाचवता येता.
अलार्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सीपीआर आणि बीएएसचे प्रशिक्षण: हदयविकाराच्या झटक्यात रुग्णाला वाचवण्याचे प्रशिक्षण
Date:

