मुंबई, २९ डिसेंबर २०२३ – कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड (केपआयएल) या भारतातील सर्वात मोठ्या, नोंदणीकृत इंजिनियरिंग आणि बांधकाम कंपन्यांपैकी एका कंपनीने आपल्या संयुक्त भागिदारी (जेव्ही) आणि आंतरराष्ट्रीय उपकंपन्यांसह ३२४४ कोटी रुपयांची नवी कंत्राटे/नोटिफिकेशन्स मिळवली आहेत.
नव्या कंत्राटाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –
· बिल्डिंग्ज अँड फॅक्टरीज (बी अँड एफ) व्यवसायासाठी केपीआयएलला आतापर्यंतचे सर्वात मोठे डिझाइन आणि बांधकामाचे कंत्राट मिळाले असून त्यामध्ये दक्षिण भारतातील मोठ्या निवासी प्रकल्पाच्या बांधकामाचा समावेश आहे. अंदाजे १३ दशलक्ष चौरस फूट बिल्ड- अप एरिया असलेल्या या प्रकल्पाचे काम एका प्रतिष्ठित डेव्हलपरकडून मिळाले आहे.
· भूमीगत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे डिझाइन व बांधकामाचे कंत्राट मिळाले असून त्यामुळे केपीआयएल टीबीएम टनेलिंग कामासह इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात प्रवेश करत आहे.
· परदेशी बाजारपेठांमधून ट्रान्समिशन आणि वितरण (टी अँड डी) व्यवसायासाठी कंत्राट मिळाले आहे.
केपीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष मोहनोत म्हणाले, ‘वेगवेगळ्या व्यवसायांसाठी धोरणात्मक कंत्राटे मिळाल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. भूमीगत मेट्रो रेल टनेलिंग प्रकल्पात केलेला प्रवेश शाश्वत शहरी पायाभूत सुविधा क्षेत्राप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवणारा आहे. बी अँड एफ व्यवसायातील डिझाइन आणि बांधकामाचे सर्वात मोठे कंत्राट आम्हाला एका प्रतिष्ठित डेव्हलपरकडून मिळालेले असून त्याअंतर्गत दक्षिण भारतात मोठा निवासी प्रकल्प उभारायचा आहे. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील आमचे स्थान आणखी मजबूत होईल. या मोठ्या कंत्राटांअंतर्गत इंजिनियरिंग कौशल्यावर भर दिला जाणार असून त्यावरून वैविध्यपूर्ण व्यवसाय विभागांतील आमची क्षमता दिसून येते.’
श्री. मोहनोत म्हणाले, ‘आर्थिक वर्ष २४ मधे आमच्याकडे एकूण १७,६८५ कोटी रुपयांची कंत्राटे असून त्यामुळे शाश्वत विकासासाठी दमदार चालना मिळेल.’