पुणे-केंद्रीय मंत्री मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीकडून मारहाण झाल्याच्या वृत्ताने राजकीय आणि शासकीय वर्तुळात जोरदार चर्चा उसळली आहे. या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारणेच्या टोळीतील गुंडांची नावे समजू नये यासाठी पोलिसांचा आटापिटा सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला भर चौकात भर दुपारी मारहाण होते. पोलीस गुन्हा तर दाखल करतात. पण, गजा मारणेच्या गुंडाची नावे मीडियामध्ये येणार नाही, यासाठी धडपड करताना दिसतात. त्यामुळे पुण्यात पोलिसांचे नेमके काय चालले आहे.ते दबावाखाली आहेत कि जर पोलिसांवरच अन्याय होत असेल, तर आपला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पुणेकरांना आता पडला तर नवल वाटणार नाही.
पोलिसाला बेदम मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खरडपट्टी काढल्यानंतर तीन दिवसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांना दाखल करुन आरोपींना नाईलाजाने अटक करावी लागली. हे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी कोथरुडमध्ये IT इंजिनिअरला भर दुपारी शेकडो लोकांच्या समोर बेदम मारहाण झाली. हा प्रकार कोथरुडमधील तसेच शहरातील सर्व महत्वांच्या भाजपच्या पदाधिकार्यांपर्यंत पोहचला. त्यामुळे कोथरुड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा तर दाखल करुन घेतला. पण मारहाण करणारे हे गजा मारणे यांच्या टोळीतील आहेत, हे लक्षात आल्यावर पोलिसांची धावपळ सुरु झाली. ही माहिती मीडियापर्यंत पोहचल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांच्यासह पोलीस अधिकार्यांना पत्रकारांचे फोन सुरु झाले. परंतु, कोथरुडमधील पोलीस अधिकारी पत्रकारांना टाळाटाळ करु लागल्याचे चित्र समोर आले आहे. ज्याला मारहाण झाली तो आपल्या कार्यालयात कामाला नाही मात्र भाजपचा कार्यकर्ता असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.

