पुणे दि. 21 : पुनर्वसन महासंचालक कार्यालय, संरक्षण मंत्रालय यांच्यामार्फत 28 फेब्रुवारी रोजी एअर फोर्स स्टेशन, विमान नगर गेट, पुणे येथे पुनर्रोजगार, पुनर्वसनासाठी माजी सैनिकांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये पात्र माजी सैनिक (नोकरी शोधणारे) आणि कॉर्पोरेट, नियोक्ते (नोकरी प्रदाते) यांच्यात सामायिक प्लॅटफॉर्मवर थेट आणि त्वरित संवाद साधण्यात येणार आहे.
तरी सर्व माजी सैनिकांनी ओळखपत्र आणि पाच प्रती बायोडाटा फोटोसह उपस्थित राहण्याचे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहसंचालक, नवी दिल्ली दुरध्वनी क्रमांक ०११-२०८६२५४२ व पुनर्वसन महासंचालक कार्यालय (दक्षिण), पुणे दुरध्वनी क्रमांक ९४२११९८८२३, ९४०५६०६१३६ येथे संपर्क साधावा.

