अंजली दमानियांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स,NCP चा आरोप : तर दमानिया म्हणाल्या,लढणाऱ्यांचा हा मानसिक छळ, ताबडतोब चौकशी करा अन दोषीला शिक्षा करा

Date:

दमानिया म्हणाल्या,स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार ? CM/DCM माझ्या सगळ्या खात्यांची,मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्या

मुंबई-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधीची माहिती पुराव्यांसकट उघड करण्याचा इशाराही दमानिया यांना दिला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांचे आरोप धूडकावून लावत सरकारला थेट आपले बँक अकाउंट तपासण्याचे आव्हान दिले आहे.

अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व कृषि घोटाळ्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांची पुरती कोंडी केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासन आदेश काढून कृषि खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला 15 देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा सूरज चव्हाण यांनी आपल्या एका पोस्टद्वारे दिला आहे.

दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सरकारला आपले खाते तपासण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्या या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या, खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आव्हान. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील unaccounted आहे का ते पाहावे.

इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे?

महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल, तर अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी. दोघांनाही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...