पुणे-भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL) ने त्वस्ता इंजिनिअरिंगच्या सहकार्याने पुण्यातील माण हिंजवडी येथील गोदरेज एडन इस्टेटमध्ये भारतातील पहिला 3D-प्रिंटेड G+1 व्हिला सादर केला आहे. अत्याधुनिक 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा लाभ घेत, कंपनीने डिझाइन, कार्यक्षमता आणि शाश्वततेमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे यश संपादन केले असून रिअल इस्टेट उद्योगासाठी परिवर्तनात्मक पाऊल ठरले आहे.
अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्राचा वापर करून उभारलेले हे व्हिला 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणामध्ये क्रांती घडविण्याची क्षमता दर्शवते. जून 2024 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाची पूर्णता केवळ चार महिन्यांत झाली. यावरून बांधकामात 3D प्रिंटिंगच्या गती आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय येतो. संगणक-निर्मित डिझाइनचा वापर करून विशेष साहित्याद्वारे संरचना स्तरानुसार उभारण्यात आली. त्यामुळे अचूकता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करत बांधकामाचा कालावधी, साहित्याचा अपव्यय आणि श्रमखर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला. या वास्तुशास्त्रीय नवकल्पनेने आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि शाश्वत डिझाइन यांचा मिलाफ साधत समकालीन निवासी जागांची पुर्नभाषा करणारे घटक सादर केले आहेत.
3D-प्रिंटेड व्हिलाची मुख्य वैशिष्ट्ये:
• प्रगत अल्गोरिदमचा वापर करून व्हिलाची ऑर्गनिक आणि प्रवाही रचना तयार करण्यात आली असून त्यामुळे रचनात्मक अखंडता आणि दृश्यात्मक आकर्षण वाढते.
• नैसर्गिक प्रकाश अधिकाधिक वापरण्यासाठी तयार केलेले वैशिष्ट्य. त्यामुळे ऊर्जा वापर कमी होतो आणि मोकळेपणा व विस्ताराची अनुभूती मिळते.
• पारंपरिक सरळ जिन्यांना पर्याय म्हणून हे शिल्पाकृती घटक घराच्या अंतर्गत सजावटीत कलात्मक आणि प्रभावी छाप सोडतात.
• निसर्गाने प्रेरित व्हीलाच्या प्रवाही रचना आपल्या आजूबाजूच्या परिसरासोबत सहज एकरूप होऊन सौहार्द आणि कल्याणाची भावना निर्माण करतात.
• 3D प्रिंटेड आर्किटेक्चरची खासियत असलेला स्तरीय बाह्य नमुना तंत्रज्ञानाच्या अचूकतेचे प्रदर्शन करतो आणि संरचनेस अनोखा वैशिष्ट्यपूर्ण आणि भविष्यकालीन लुक प्रदान करतो.
हे यश भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात 3D प्रिंटिंगच्या व्यापक स्वीकृतीसाठीचा मार्ग मोकळा करते आणि अधिक स्मार्ट, अधिक शाश्वत शहरांच्या विकासाला गती देते. प्रगत डिझाइन तत्वे आणि पर्यावरणपूरक बांधकाम तंत्र यांचे एकत्रीकरण करून गोदरेज प्रॉपर्टीज आधुनिक जीवनशैलीच्या संकल्पना पुन्हा परिभाषित करत आहे आणि भारतातील गृहनिर्माण क्षेत्राचे भविष्य घडवत आहे.
या ऐतिहासिक टप्प्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना गोदरेज प्रॉपर्टीजचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विकास सिंघल म्हणाले, “गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये आम्ही रिअल इस्टेटमध्ये नाविन्यपूर्णता आणि शाश्वततेच्या सीमा सतत पुढे नेण्यास वचनबद्ध आहोत. गोदरेज एडन इस्टेट येथे भारतातील पहिले 3D-प्रिंटेड व्हिला सादर करणे हे भविष्यकालीन, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींच्या दिशेने असलेल्या आमच्या दृष्टीकोनाची पावती आहे. 3D प्रिंटिंग मध्ये गृहनिर्माण क्षेत्रात वेगवान, अधिक अचूक, लक्षणीयरित्या अधिक शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम वैशिष्ट्यांचा समावेश करून प्रकल्पाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याची क्षमता आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात या तंत्रज्ञानाची ओळख करून देताना आम्हाला अभिमान वाटतो आणि भविष्यात त्याच्या आणखी उपयोजनांचा शोध घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.”