पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२५:एकूण महसूली गरज व प्रस्तावित वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरण कंपनीने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरूवारी, दि. २७ फेब्रुवारीला पुणे येथील महाराष्ट्र शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (सीओइपी) मुख्य सभागृहात (ई-सुविधा केंद्रात) जाहीर ई-सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण कंपनी) आर्थिक वर्ष २०२२-२३ व आर्थिक वर्ष २०२३-२४ चे अंतिम अचूक समायोजन, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे तात्पुरते समायोजन व आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० या पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर ही जाहीर ई-सुनावणी होणार आहे.