अधिसूचना -Pune Municipal Corporation recruitmet 2025Download
अधिक माहितीसाठी ही अधिसूचना पाहा आणि लवकरात लवकर अर्ज करा.
पुणे : महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात आहेत. या भरतीतून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक या पदांची भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांना https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर अधिकची माहिती मिळू शकते. या भरतीतून एकूण ५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीत भाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी या भरतीसाठी मुलाखती होणार आहेत. पद, वेतन, श्रेणी, वयोमर्यादा, शिक्षण तसेच अर्ज कसा भरायचा ही सगळी माहिती जाणून घेऊयात.
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदासांठी भरती होत आहे. मुलाखतीतून या भरतीतील विविध पदांची निवड होणार आहे. ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-४११०११०’ या पत्त्यावर मुलाखती होणार आहेत. २० फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाखती होणार आहेत.
पदाचे नाव रिक्त जागा
प्राध्यापक ०४ जागा
सहयोगी प्राध्यापक ११ जागा
सहायक प्राध्यापक १६ जागा
वरिष्ठ निवासी १६ जागा
कनिष्ठ निवासी ०३ जागा
एकूण रिक्त जागा ५०
Pune muncipal corporation bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक: MD/MS/DNB
सहयोगी प्राध्यापक: MD/MS/DNB
सहाय्यक प्राध्यापक: MD/MS/DNB
वरिष्ठ निवासी – MD/MS/DNB
कनिष्ठ निवासी – MBBS
Pune mahanagarpalika bharti 2025 age limit: वयोमर्यादा –
प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ५५ वर्षे
सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ५० वर्षे
सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे
ज्येष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे
कनिष्ठ रहिवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे
Pune Municipal Corporation recruitmet 2025 Salary detail: पदांनुसार मासिक वेतन –
प्राध्यापक- १ लाख ८५ हजार
सहयोगी प्राध्यापक – १ लाख ७० हजार
सहायक प्राध्यापक- १ लाख रुपये
वरिष्ठ निवासी – ८० हजार २५०
कनिष्ठ निवासी – ६४ हजार ५५१

