पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बुधवार, दि. 26 फेब्रुवार 2025 रोजी पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराजवळील एमईएस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कुमार गंधर्वांची गायकी याविषयी पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे संवाद साधणार असून प्रात्यक्षिकासह सादरीकरण करणार आहेत. तसेच विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन होणार असून पुष्कर लेले हे पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाविषयीची वैशिष्ट्ये गायनातून दर्शविणार आहेत. कलाकारांना माधव लिमये, यश सोमण, गौतम टेंबेकर, अंशुल प्रतापसिंग साथसंगत करणार आहेत. नृत्यसंध्या या कार्यक्रमाअंतर्गत अरुंधती पटवर्धन आणि कलावर्धिनी ग्रुपच्या नृत्यांगना भरतनाट्यम् नृत्याविष्कार सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे, सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.